करमाळ्यामधून अपक्ष उमेदवार संजय शिंदे विजयी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी शिवसेनेच्या रश्मी बागल यांचा पराभव करत दणदणीत विजय साजरा केला. या निवडणुकीत दोघांमध्येही काट्याची टक्कर झाली असून अखेर यामध्ये संजय शिंदे यांनी बाजी मारली. यामध्ये संजय शिंदे यांना 78822 मते मिळाली असून रश्मी बागल यांना 52915 मते मिळाली असून त्यांनी बागल यांचा 25907 मतांनी पराभव केला आहे.

या मतदारसंघात दोघांमध्ये काट्याची टक्कर झाली असून अशी अपेक्षा होती. मात्र बागल यांच्याऐवजी अपक्ष नारायण पाटील यांनी जास्त मते (73328) घेतली. मात्र अखेर शिंदे यांनी या लढतीत विजय मिळवला. रश्मी बागल यांच्या पराभवाला नारायण पाटील हे मोठे जबाबदार आहेत. अपक्ष उमेदवार असलेल्या पाटील यांनी बागल यांच्यापेक्षा जास्त मते घेत बागल यांचे आमदारकीचे स्वप्न धुळीस मिळवले. त्याचबरोबर राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराचा पाठिंबा त्यांनी काढून घेतल्यामुळे त्याचा दारुण पराभव झाला आहे.

1) संजय शिंदे (अपक्ष )- 78822
2) रश्मी बागल (शिवसेना)- 52915
3)अतुल भैरवनाथ खुपसे (वंचित बहुजन अघाडी)- 4468
4)नारायण (आबा) गोविंदराव पाटील (अपक्ष )- 73328
5)पाटील संजय कृष्णराव (राष्ट्रवादी काँग्रेस )- 1391
6) नोटा -1597

टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com