सारा अली खान कार्तिक आर्यनसोबत मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली ‘रंगीबेरंगी’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन सध्या लव आज कल 2 या आगामी सिनेमाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनसाठी सारा आणि कार्तिक अनेक ठिकाणी उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक साराचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अशात पुन्हा एकदा दोघांचे काही फोटो आणि एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सोशलवर चर्चेत आहेत.

कार्तिक आणि सारा नुकतेच बांद्र्यात स्पॉट झाले होते. यावेळी साराच्या ग्लॅमरस लुकनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सध्या साराच्या या लुकची खूप चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8WfcVEJG9-/

साराच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर सारा मल्टी कलर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. ड्रेससोबतच तिनं ब्लॅक सॅन्डल घातले होते. तिच्या लुक आणि हेअरस्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

कार्तिकच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर कार्तिकनं व्हाईट जॅकेट आणि ब्लू डेनिम घातली होती. मीडियासमोर आल्यानंतर दोघांनीही मस्त अंदाजात कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. सारा आणि कार्तिकचा लव आज कल 2 हा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B8V1SgeBCnX/

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लव आज कल 2 या सिनेमानंतर सारा अतरंगी रे या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती साऊथ सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सोबत काम करताना दिसणार आहे.