‘केदारनाथ’च्या शूटिंगदरम्यान सारा अन् सुशांतचं जुळलं होतं ‘सूत’, ‘या’ कारणामुळं झाला नात्याचा शेवट

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी सुशांतच्या त्यावेळच्या ड्रायव्हरने मोठा गौप्सस्फोट करत त्यांच्या भेटी माझ्या समोरच झाल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) दोन दिवसांपूर्वी दिली आहे. दरम्यान, केदारनाथ चित्रपटावेळी सुशांत आणि साराचे नाव खूप चर्चेत होते. त्यावेळी ते दोघे बॉलिवूडमधील नवीन लव्हबर्ड बनले होते पण अचानक सर्व काही संपलं.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सुशांतने साराला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिला पाहत राहिला होता. पहिल्यांदा ते दोघे केदारनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि आई अमृता सिंगसोबत भेटले होते. पहिल्या भेटीतच सुशांतने सारा अली खानला इंप्रेस केलेलं. सारा सुद्धा सुशांतचे केअरिंग नेचर पाहून इंप्रेस झालेली.

केदारनाथ या चित्रपटाच्या माध्यमातून सारा अली खानने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि सारा एकेमकांच्या जवळ आल्याचं म्हटलं जात. केदारनाथ चित्रपटाच्या रॅपअप पार्टीत सुद्धा सारा आणि सुशांतची जवळीक पाहण्यासाठी होती. तसेच साराने सर्वांसमोर सुशांतची खूप प्रशंसा केली होती. अलीकडे सारा अली खान व सुशांत सिंग राजपूत यांचा कोणता ना कोणता फोटो समाज माध्यमात व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे दोघांच्यात काहीतरी खास होते, असा अंदाज लावला जात आहे.

याबाबत सुशांत सिंग राजपुतच्या फार्महाउस वरील केअर टेकरने सांगितलं की, सारा ली खान त्यांच्या फार्महाउस सुशांतला भेटायला येत होती. तसेच सुशांतचा रुममेट सॅम्युअल हाओपिकने सुद्धा म्हटलं आहे की, सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते. पण साराने कोणाच्यातरी दबावामुळे सुशांतसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like