लहानपणापासूनच ‘फोटोजनिक’ आणि ‘स्टायलिश’ आहे सारा अली खान !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सारा अली खान नेहमीच सोशलवर सक्रिय असेत. अलीकडेच सारानं एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता ज्यामुळं ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं कोलाज शेअर केला आहे ज्यात आणखी एक थ्रोबॅक फोटो आहे.

https://www.instagram.com/p/B68M5vKhYAg/

सारानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हे एक कोलाज आहे. यात दिसत आहे की, एका बाजूला तिच्या लहानपणीचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला तिचा अलीकडच्या काळातील फोटो आहे. एका फोटोत ती क्युट दिसत आहे आणि एका फोटोत ती स्टायलिश दिसत आहे.

साराच्या या फोटोवरूनच लक्षात येत आहे की, ती लहानपणापासूनच खूप फोटोजेनिक आहे. आधीपासूनच तिला पोज देणं आणि क्लिक करून घेणं येत आहे. सारानं या फोटोला खूपच विनोदी कॅप्शन दिलं आहे. सारा लिहिते की, “हा हम बचपन से ही ऐसे आहे”

https://www.instagram.com/p/B68inF2Budj/

साराचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सही यावर कमेंट करत आहेत. वरुण धवननंही तिला ट्रोल केलं आहे. वरुणनं कमेंट केली की, सारा का सारा.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B8BRusxl9tE/

https://www.instagram.com/p/B8BSZDyFojy/