बँकिंग क्षेत्रात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 1163 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक नवीन संधी असून IBPS ने मोठ्या प्रमाणात भरती सुरु केली आहे. IBPS ने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 1,163 पदांची भरती करणार आहे. या पदांसाठी उद्यापासून अर्जप्रक्रिया सुरु होणार असून 26 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ibps.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी विस्तृत माहिती मिळणार असून आम्ही तुम्हाला यासंबंधी आधीक माहिती देत आहोत.

पदाचे नाव –
आयटी ऑफिसर स्केल – 1
एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर लॉ ऑफिसर
राजभाषा अधिकारी स्केल- 1
मार्केटिंग ऑफिसर स्केल- 1
एचआर/पर्सनल ऑफिसर -1

पदांची संख्या -1,163

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड हि तीन पद्धतीने आधारे करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा होणार असून दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा तर शेवटच्या टप्प्यात मुलाखत होणार आहे.

महत्वाच्या तारखा
1) ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात :6 नोव्हेंबर 2019
2) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 नोव्हेंबर 2019
३) पूर्व परीक्षेचे ऍडमिट कार्ड _ डिसेंबर 2019
4) ऑनलाईन पूर्व परीक्षा -28.12.2019 आणि 29.12.2019
5) ऑनलाईन पूर्व परीक्षा निकाल -जानेवारी 2019
6) मुख्य परीक्षेचे ऍडमिट कार्ड- जानेवारी 2019
7) मुख्य ऑनलाईन परीक्षा- २५ जानेवारी 2019
8) मुलाखतीचे ऍडमिट कार्ड- फेब्रुवारी 2019
9) मुलखात – फेब्रुवारी

अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी ibps.in या अधिकृत वेबसाईटवर 26 नोव्हेंबर 2019 रोजीपर्यंत अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर ऑनलाईन प्रिंट काढून ती तुमच्याकडे सांभाळून ठेवा.

Visit : Policenama.com