विमान बिघाडामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे सौदीने इम्रान खानला विमानातून उतरवले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच विमान खराब झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागला होता. मात्र ही बाब चुकीची असल्याचे आता समोर आले आहे. कारण इम्रान खान हे त्यावेळी संयुक्त राष्ट्रात भाषण देऊन निघाले होते आणि ते प्रवास करत असलेले विमान हे सौदीच्या युवराजांचे होते.

इम्रान खान यांनी केलेले संयुक्त राष्ट्रातील भाषण सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना काही आवडले नाही, त्यामुळे त्यांनी इम्रान खान यांना पुन्हा माघारी सोडल्याचे समजते त्यामुळे खान यांना दुसऱ्या विमानाने परतीचा प्रवास करावा लागला होते. याबाबतचे एक वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्राने प्रसारित केल्यावर ही बाब समोर आली आहे.

सौदीच्या युवराजांनी इम्रान यांना अतिथी म्हणून सन्मान देत त्यांच्यासाठी आपलं विशेष विमान उपलब्ध करून दिलं. या विमानाने इम्रान अमेरिकेत गेले. तिथे संयुक्त राष्ट्रांची आमसभा उरकून पुन्हा त्याच विमानाने ते पाकिस्तानात परतत होते तेव्हा सौदीचे युवराज सलमान यांनी विमान पुन्हा मागे नेण्यास सांगितले.पाकिस्तानची इराणशी असलेली मैत्री सुद्धा सौदीच्या युवराजच्या नजरेत आली असेल असं पाकिस्तानी वृत्तपत्राने यावेळी म्हंटले आहे.

पाक सरकारने वृत्त फेटाळले
पाक सरकारने त्यांच्याच वृत्तपत्राचा दावा फेटाळला आहे. असे काही घडलेले नसून पाकिस्तान आणि सौदी या दोनीही देशांचे संबंध उत्तम आहेत आणि पुढेही ते चांगलेच राहतील असे पाकिस्तान सरकारने म्हंटले आहे.

 

Visit : Policenama.com