ताज्या बातम्यापुणेमनोरंजन

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची (Corona in Pune) संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे. यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav) रद्द करण्यात येत असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे (Arya Sangeet Prasarak Mandal) कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (Srinivas Joshi) यांनी कळवले आहे.

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi) यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने पुण्यातील (Pune) सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला परवानगी दिली होती. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर नियमांचे पालन करत मोहोत्सव आयोजित करण्यात आला होता. तारीख ही ठरली होती. मात्र आता पुन्हा राज्यात आणि पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title : Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | This year’s Sawai Gandharva Bhimsen Mahotsav canceled on the backdrop of Corona

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 
Back to top button