नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही SBI खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. SBI च्या मते जर तुम्ही केवायसी अपडेट केले नाही तर बँक तुमचे खाते फ्रीज करु शकते. बँकेने एका वृत्तपत्रामध्ये एक सार्वजनिक नोटीस जारी केली आहे, ज्याद्वारे बँक आपल्या ग्राहकांना समस्या मुक्त बँकिंगचा अनुभव देऊ इच्छित आहे त्यामुळे आपल्या ग्राहकांना बँकांनी केवायसी पूर्ण करण्यास सांगितले आहे. भारताची सर्वात मोठी बँक एसबीआयने असेही सांगितले आहे की केवायसी नसलेल्या बँक खात्यांना फ्रीज केले जाऊ शकते.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे बँकेने वेळोवेळी ग्राहकांना केवायसीचे अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या ग्राहकांचा केवायसी अपडेट झालेले नाही, त्यांना नोटीस देखील जारी केली आहे.
एसबीआयने आपल्या सार्वजनिक नोटीसमध्ये सांगितले की, ज्या ग्राहकांना नोटीस मिळाली आहे, त्यांना बँकेच्या शाखेत जाऊन आपले दस्तावेज दाखवावे लागतील. एसबीआयने आपल्या सार्वजनिक नोटीसमध्ये असे सांगितले की, जर आवश्यक दस्तावेज 28-2-2020 पूर्वी उपलब्ध केले गेले नाहीत तर बँक केवायसी अपडेट न झाल्यास खाते फ्रीज केले जाईल. बँकेने आपल्या ग्राहकांना अंतिम तारखेपूर्वा केवायसी करण्याचे अलर्ट मेसेज द्वारे दिले आहेत.
यापूर्वी आरबीआयने आपल्या केवायसी दिशानिर्देशनात संशोधित केले होते आणि एनपीआर पत्रांचे एक दस्तावेज तयार केले होते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या प्रकारची नोटीस जारी केली होती.
केवायसी करणं, आरबीआयच्या मानदंडानुसार बँकिंग प्रणालीचा एक महत्वाचा हिस्सा आहे. केवासयी मानदंडाचे पालन न केल्यास बँकांना दंड ठोठावण्यात येईल. एसबीआय वेबसाइटनुसार भारतीय रिझर्व बँकद्वारे 29 नोव्हेंबर 2004 ला केवायसी मानक – एंटी मनी लॉंड्रिंगवर जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशनुसार सर्व बँकांचे पालन करणं आवश्यक आहे.
बँक खातेदारांना आपल्या जवळच्या शाखेत जावे लागेल आणि आपले एक ओळखपत्र सादर करावे लागेल.
– पासपोर्ट
– मतदान ओळख पत्र
– वाहन परवाना
– आधार कार्ड
– मनरेगा कार्ड
– पॅन कार्ड
– एनपीआरचे पत्र
– सध्याचा फोटो
– मोबाइल नंबर
ग्राहकांप्रमाणे सर्व वाणिज्यिक बँक, सरकारी बँक, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि अन्य मायक्रोफायनान्स कर्जदात्यांना देखील केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँक किंवा वित्तीय संस्थांना हे दस्तावेज उपलब्ध करुन द्यावे लागेल.
- फेसबुक पेज लाईक करा –
- वाढत्या वयात महिलांना होतात ‘या’ 6 समस्या ; असा करा बचाव !
- ‘ब्रेन स्ट्रोक’ टाळण्यासाठी करा ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या 12 लक्षणे
- ‘बॉडी डिटॉक्स’ म्हणजे काय ? बिघडले तर ‘हे’ 5 परिणाम होतात शरीरावर
- काय आहे ‘हर्निया’ आजार ? या 8 पद्धतीने घ्या काळजी
- भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर !
- ALERT थंडीत वाढते वजन ! ‘या’ 6 उपायांनी ठेवा नियंत्रणात, ‘ही’ आहेत 5 कारणे