SBI चा नवा Restructuring Plan, लाखो ग्राहकांना फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : कर्जदारांवर झालेला कोविड-19 महामारीचा परिणाम कमी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) नुकतीच लोन रिस्ट्रक्चरिंगची घोषणा केली आहे. एसबीआय कार्ड यूजर्सना सुद्धा या लोन रिकास्ट स्कीमचा लाभ घेण्याची संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने एक वक्तव्य जारी करून म्हटले आहे की, ही पॉलिसी त्या अकाऊंटसाठी आहे, ज्यामध्ये कोविड-19 मुळे पेमेंट क्षमतेवर परिणाम झाला आहे. आज आपण एसबीआय कार्डसाठी या स्कीमअंतर्गत पात्रता, फायदे, रिस्ट्रक्चरिंग प्लॅन, क्रेडिट रिपोर्टवर याच्या परिणामासह अन्य आवश्यक माहिती घेणार आहोत.

पात्रता
एसबीआय कार्ड आपल्या असेसमेंटच्या आधारे योग्य अकाऊंटची एक लिस्ट सुद्धा करेल. यासाठी खालील गोष्टींचा विचार केला जाईल.

1. ज्या अकाऊंटना स्टँडर्ड अकाऊंटम्हणून क्लासिफाय केले आहे आणि 1 मार्च 2020 पासून किमान 30 दिवस अगोदर यामध्ये कोणतेही डिफॉल्ट झालेले नाही, असे अकाऊंट रिस्ट्रक्चरिंगसाठी योग्य असेल.

2. 1 मार्च 2020 च्या पूर्वी 12 महिन्यात या अकाऊंटला एनपीआयप्रमाणे क्लासिफाय केलेले नसावे.

3. यामध्ये ती अकाऊंट सहभागी असतील, ज्यांनी 1 मार्च ते 31 ऑगस्टच्या दरम्यान मोरेटोरियमचा लाभ घेतला आहे किंवा या दरम्यान किमान बाकीचे रिपेमेंट केलेले नाही.

4 पात्रता व्यक्तीगत अकाऊंटच्या स्तरावर ठरवली जाईल. हे ग्राहकांच्या स्तरावर होणार नाही.

रिस्ट्रक्चरिंग प्लॅन
सध्याच्या रिस्ट्रक्चरिंग प्लॅनअंतर्गत एकुण शिल्लक बाकी कमाल 24 महिन्यांच्या टर्म लोनमध्ये कन्व्हर्ट केली जाईल. रिस्ट्रक्चर करण्यात आलेल्या अकाऊंटवर व्याजदर 13 ते 19 टक्केच्या दरम्यान असेल. व्याजदर या गोष्टीवर अवलंबून राहिल की, टर्म लोनचा कालावधी 3 ते 24 महिन्यांपैकी कोणता निवडला जातो.

हे रिझॉल्युशन 31 डिसेंबर 2020 पर्यंत फायनल करावे लागेल आणि 90 दिवसांच्या आत ते लागू सुद्धा करावे लागेल. कार्पोरेट अकाऊंटसाठी हे लिमिट 180 दिवसांसाठी असेल.

असा काम करेल हा रिस्ट्रक्चरिंग प्लॅन
यासाठी ग्राहकांना प्लॅनच्या सहमतीच्या आधारावर ईएमआय कपातीच्या ऑटो डेबिट किंवा नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस किंवा पीडीसीएस उपलब्ध करून द्यावे लागेल. याची टाइमलाइन एसबीआयस कार्ड ठरवेल.

क्रेडिट कार्ड स्टेटस
जर एखाद्या कस्टमरने ईएमआय प्लॅन निवडला तर क्रेडिट कार्डवर एक्सटेंडेड फॅसिलिटी डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यात येईल. कस्टमर आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करू शकणार नाही. मात्र, जेव्हा 3 ते 6 महिन्यासाठी रेग्यलर ईएमआय केला जाईल तेव्हा कार्ड पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट केले जाईल.

असा होईल क्रेडिट स्कोअर परिणाम
बँकेने याबाबत माहिती दिली आहे. जर कुणी कस्टमर रिस्ट्रक्चरिंग पर्याय निवडत असेल तर त्याच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये त्यास रिस्ट्रक्चर्ड दाखवले जाईल. यानंतर कर्जदाराच्या क्रेडिट हिस्ट्रीला क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीच्या पॉलिसीच्या आधारावर गव्हर्न केले जाईल.

या अकाऊंटवर लागू नाही पॉलिसी
ही पॉलिसी एसबीआय कार्ड एम्प्लॉयी अकाऊंटवर लागू होणार नाही. सोबतच, यामध्ये त्या अकाऊंटला सहभागी केले जाणार नाही, जी मार्च ते जुलैच्या दरम्यान रिस्ट्रक्चर केली होती किंवा सेटलमेंटच्यानंतर अनिवार्य लेटर जारी केले होते.