SBI नं केले ग्राहकांना अलर्ट ! ऑनलाईन बँकिंगच्या वेळी ‘या’ 6 टीप्स लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये लोक ऑनलाइन बँकिंग व ऑनलाइन व्यवहारांवर अधिक विश्वास ठेवत आहेत. तथापि, या कठीण परिस्थितीतही ऑनलाइन फसवणूक करणारे पूर्णपणे सक्रिय आहेत. हे लक्षात घेता, देशातील सर्वात मोठी बँक (एसबीआय) ने ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग संदर्भात काही टिप्स दिल्या आहेत. ‘ए लेटर फॉर योर सेफ्टी’ या पत्राद्वारे बँकेने आपल्या ग्राहकांना सहा टिप्स दिल्या आहेत आणि म्हटले आहे की, ऑनलाईन बँकिंगमध्ये या टिप्सकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. सावधगिरी बाळगून सेफ बँकिंग करता येते, असे बँकेने या संदर्भात ट्विट केले आहे. ग्राहकांनी फसवणूक करणाऱ्यांपासून त्यांची माहिती सुरक्षित करण्यासाठी या सहा प्रोटोकॉलकडे लक्ष दिले पाहिजे, असे बँकेने म्हटले आहे.

1. एसएमआय ग्राहकांनी ईएमआय किंवा खात्यांमध्ये पैसे पाठवण्याच्या नावाखाली ओटीपी आणि बँक तपशील मागणाऱ्या कोणत्याही मेसेजवर क्लिक करु नये.

2. बनावट एसएमएस, ई-मेल, फोन कॉल आणि रोख बक्षीस आणि नोकरीच्या प्लेसमेंट सारख्या दाव्यांसह जाहिरातींकडे दुर्लक्ष करा.

3. बँकेशी संबंधित सर्व पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा.

4. हे लक्षात ठेवा की, एसबीआय किंवा बँक प्रतिनिधी एसएमएस, ई-मेल किंवा फोन कॉलद्वारे कधीही वैयक्तिक माहिती, पासवर्ड, ग्राहकांचा ओटीपी विचारत नाहीत.

5. संपर्क क्रमांक किंवा कोणत्याही शाखेच्या इतर तपशीलांसाठी एसबीआयची अधिकृत वेबसाइट वापरा. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर येणाऱ्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका.

6. कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीबद्दल तातडीने स्थानिक पोलिस अधिकारी आणि जवळच्या एसबीआय शाखेला कळवा.