बिथरलेल्या बैलाच्या धडकेत मुलगी ठार तर आई जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन

मोहरम सणानिमित्त माहेरी आलेल्या मुलीला, आईला आणि तिच्या भावजयला एका बिथरलेल्या बैलाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला तर आई आणि भावजय गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना कळंब तालुक्यातील मारोती पोड येथे गुरुवारी रात्री दहाच्या सुमरास घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41749436-bd81-11e8-9513-7d6c8d02300c’]

पुष्पा संतोष विलाशे (वय – ३२ रा.वरध) असे मृत महिलेचे नाव आहे. बयनाबाई बाळकृष्ण कोवे (वय -६०) व मंगला चरण कोवे (वय- ३० रा.मारोती पोड) या दोघी जखमी झाल्या आहेत.

पुष्पा ही मोहरमच्या सणानिमित्त माहेरी मारोती पोड येथे आली होती. सण साजरा करून पुष्पा, तिची आई बयनाबाई व भावजय मंगला या तिघी घरासमोर असलेल्या रस्त्यावर बसल्या होत्या. त्याचवेळी अंबादास आत्राम यांचा लाकडाचे ओंडके बांधून असलेला बैल सैरावैरा पळत सुटला. बिथरलेला बैलाने या तिघींना धडक दिली. बैलाच्या मानेत बांधलेला लाकडाचा ओंडक्याचा मार पुष्पा हिच्या मानेला बसला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर बयनाबाई यांचा पाय फ्रॅक्चर झाला तर मंगला गंभीर जखमी झाल्या आहेत. पुष्पा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

पुणे : एटीएममधून नऊ लाखांची रक्कम चोरणारा गजाआड

घटनेची माहिती पोलीस पाटील तेजस्विनी सलाम, तंटामुक्तीचे अध्यक्ष युनूस पठाण यांनी वडगाव (जंगल) पोलिसांना दिली. जमादार होमदेव किनाके, प्रेमदास फुल्लुके यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3492ee6d-bd83-11e8-ba41-b37c5d9f2930′]