शाळकरी मुलीला अडवून बलात्कार करण्याची धमकी

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन

शाळेत चाललेल्या मुलीला अडवून बलात्कार करण्याची धमकी दिल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या अंगावरील शाळेचा गणवेश ओढून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश चंद्रकांत भोई (रा. शहा, ता. इंदापूर) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्राॅसिटी ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cdca1294-cbc8-11e8-9cb9-af5a7abb2f9a’]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी नववीमध्ये शिकत असून ती कांदलगाव शाळेत शिकते. ती सोमवारी पायी चालत शाळेमध्ये जात होती. त्यावेळी डाळिंबाच्या शेताजवळ आरोपी आकाश भोई हा मोटार सायकलवरून पाठीमागे आला. मुलीसमोर थांबून तिच्याशी अश्लील संभाषण करून गैरवर्तन करू लागला. आरोपी आकाशने तिला तुझे वडील कुठे आहेत? अशी विचारणा केली. त्यावर मुलीने ते रात्री बाहेर गेले होते, अद्याप घरी आलेले नसल्याचे सांगितले. आरोपीने तिला, ‘मी तुझ्यावर आता बलात्कार करतो. तुझ्या घरी कोण कोण आहे?’अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्या अंगावरील गणवेश पाठीमागून ओढला.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d86ab65e-cbc8-11e8-9a05-11e7887992b5′]

यासर्व प्रकारानंतर मुलगी घाबरली व त्याला धक्का देवून तेथून पळाली. शाळेत न जाता घरी जावून तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आई आणि आत्या यांच्यासोबत पोलीस ठाण्यात जाऊन आकाश भोईविरुद्ध तक्रार दिली.
याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर करीत आहेत.

धावती लोकल पकडणे बेतले जीवावर