आश्चर्यकारक ! मंगळ ग्रहाचे फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे म्हटलं जात. तांबडा रंग त्याला आयर्न ओक्साइडमुळे मिळाला आहे. दरम्यान, युरोपियन स्पेस गॅस ऑर्बिटरने मंगळ ग्रहाचे काही आश्चर्यकारक फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये मंगळ ग्रह हिरव्या रंगाच्या एका रिंगने वेढलेला दिसतं आहे. काही जाणकरांच्या मते हा नजारा पृथ्वीवरील वातावरणासारख दिसतोय. तर मंगळ ग्रहाच्या चारही बाजूने असलेल्या या हिरव्या गोळ्यात ऑक्सिजन असू शकतं, ज्यामुळे ही रिंग या रंगाची बनली आहे असं स्पेस डॉट कॉमने म्हटलं आहे.

यासंदर्भात बेल्जिअम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जीन क्लाउड म्हणतात, यापूर्वी एखाद्या दुसऱ्या ग्रहावरून जेव्हा पहिल्यांदा पृथ्वीचा फोटो घेण्यात आला होता तेव्हा देखील अशाच प्रकारच्या हिरव्या रंगाचा थर दिसला होता. तसेच त्यांनी म्हटलं की, या फोटोवरून स्पष्टपणे सिद्ध होत की, मंगळावर ऑक्सिजन आहे. गेरार्ड यांच्यानुसार, हे दृश्य नॉर्दन लाईट्ससारखं आहे. नॉर्वे, आइसलँड आणि इतर स्कॅन्डवेनियन देशातील आकाशात रात्रीच्या दरम्यान अशाप्रकारच्या हिरव्या रंगाचा थर बगायला मिळतो.

वातावरणात फार वर जेव्हा सूर्याची किरणे आणि ऑक्सिजनच्या कणांची टक्कर होते तेव्हा अशाप्रकारचा प्रकाश तयार होतो. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे परमाणू जेव्हा सूर्याच्या प्रकाशातून तुटतात तेव्हा याप्रकारचा हिरवा-निळा प्रकाश तयार होतो, असं स्पेस डॉट कॉम ने म्हटलं आहे. तसेच मंगळावर जीवन अनुकूल परिस्थिती तयार करण्यासाठी रिसर्च सुरु असून, नासाचे रोव्हर मंगळ ग्रहावरती फिरत आहे. जुलैमध्ये आणखी एक रोव्हर पाठवला जाणार आहे. अशात या फोटोमुळे रिसर्चना वेग आणि नवी दिशा मिळणार असल्याचं सांगितलं जातं.