विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी : रामदास आाठवले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात होणार्‍या विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीत एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेतली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणूक होणार्‍या 9 जागांपैकी पैकी 4 जागा भाजपच्या वाटयाला येणे निश्चित झाले असून त्यापैकी एक जागा रिपाइंला द्यावी असा आग्रह आठवले यांनी धरला आहे. त्यावर भाजपला केवळ 4 जागा मिळणार असून राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या जागांसाठी चर्चेत आहेत. इच्छुकांची मोठी रीघ लागली आहे. तरीही एक चांगला मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडण्याबाबत निश्चित विचार करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आठवले यांनी दिली.