WhatsApp ‘चॅटिंग’नंतर पत्नीनं केलं सुसाईड, पतीनं मृतदेह ‘अ‍ॅसिड’ टाकून जाळलं

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यात पतीने आपल्या सुसाईड केलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकलं आहे. जेणेकरून तिचा चेहरा जळून तिची ओळख पटू नये. पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे.

मित्राने पतीला या प्रकरणात साथ दिली आहे. अमेठीतील महिलेने मंबईतील एक इसमाशी लग्न केलं होतं. यानंतर ती पुन्हा लग्न करून दुसऱ्याबरोबर राहू लागली होती. याच दुसऱ्या पतीने हे कृत्य केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट केल्यानंतर तिने सुसाईड केलं होतं. यानंतर हा सगळा प्रकार घडला.

अमेठीतील मोहसिना बानो लग्न करून मुंबईत स्थायिक झाली होती. फेसबुकवरून तिची महेंद्रशी (दुसरा पती) ओळख झाली. नंतर ती कुटुंब सोडून नाव आणि धर्म बदलून महेंद्र सोबत रहात होती. तिला पहिल्या पतीपासून 3 मुलंही होते. तिच्या पतीचं नाव नसीम आहे. 29 जून पासून मोहसिना गायब होती.
Whatsapp चैट के बाद पत्नी ने क‍िया सुसाइड, पत‍ि ने शव तेजाब से जलाया
नेमकं काय घडलं ?
आपल्या सासरच्या घरातून गायब झालेली मोहसिना महेंद्रसोबत मंदिरात लग्न करून त्याच्यासबोत राहू लागली. त्याने तिच्या भांगेत कुंकू भरलं होतं. तिनं स्वत:चं नाव खुशी ठेवलं होतं. बंथरा ठाणे क्षेत्रात येणाऱ्या दादूपूर कॉलनीत दोघं गुपचूप रहात होते. करवा चौथच्या दिवशी खुशीने व्रत ठेवलं होतं. परंतु पती महेंद्र घरी न आल्याने तिने त्याला घरी बोलावण्याचा प्रत्न केला.

तिने व्हॉट्सअ‍ॅपवर पतीला मेसेज केला की, मी सुसाईड करत आहे. तो परत आला तेव्हा ती मृत अवस्थेत दिसली. आरोपी पतीने तिला जंगलात नेलं. यासाठी त्याने मित्र संदीपची मदत घेतली. त्यांनी ओळख मिटवण्यासाठी महेंद्रने खुशीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकलं. तिला जंगलात फेकून दोघांनी तिथून पळ काढला.
Whatsapp चैट के बाद पत्नी ने क‍िया सुसाइड, पत‍ि ने शव तेजाब से जलाया
अज्ञात म्हणून ही केस दाखल झाली होती. मथुरा पोलीस प्रभारी रमेश आणि सर्व्हिलंस टीम या केसवर काम करत होती. गुरुवारी महेंद्र आणि संदीप यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे मृत खुशीचा मोबाईलही सापडला. खुशीने पूर्णपणे सजून दोन दिवस त्याची वाट पाहिली होती. ती सापडली तेव्हा त्याच्यासाठी छानपैकी सजलेली होती हे आढळून आले. महेंद्रसाठी तिने सर्वकाही सोडलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. महिलेने सुसाईड केल्याचे पोस्टमार्टममध्ये सिद्ध झाल्यानंतर आयपीसी कलम 306 आणि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : policenama.com

 कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा