आत्महत्या करण्यापुर्वी अभिनेत्री सेजल शर्मानं केलं होतं ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘दिल तो हैप्पी है जी’ या शो मधील अभिनेत्री सेजल शर्माने 24 जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केली. सेजलला सिम्मी खोसलाची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जात होते. सेजलने आत्महत्या केल्यानंतर एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात तिने मृत्यूचे कोणालाही जबाबदार ठरविले नाही असे लिहले होते. असे म्हणले जाते की तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या ज्यामुळे तिने असे केले आहे.

सेजल शर्मा उदयपूरची रहिवासी होती आणि ‘दिल तो हैप्पी है जी’ हा तिचा पहिला टीव्ही शो होता. सेजलने मृत्यूच्या दोन दिवस आधी एका नवीन सीरियलसाठी ऑडिशन दिल्याची माहिती मिळाली आहे.

सेजलच्या ‘दिल तो हैप्पी है जी’ शोची सह-कलाकार डोनाल एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाली की, सेजलने आत्महत्येच्या दोन दिवस आधी एका टीव्ही सीरियलसाठी ऑडिशन दिले होते. तिला शॉर्टलिस्टही केले होते. दुर्दैवाने तिने खूप लवकर हार मानली. जर असे करण्याचे कारण तिचे करिअर असेल तर तिने थोडी वाट पाहणे गरजेचे होते.

असे म्हणले जात आहे की सेजल निराश झाली होती. काम न मिळाल्यामुळे ती अस्वस्थ व्हायची. याशिवाय सेजलला आपल्या वडिलांच्या आजारपणाबद्दलही काळजी वाटत असे. सेजलने अनेक जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिने आमिर खानबरोबर Vivo फोनच्या जाहिरातीमध्येही काम केले आहे. तिच्या वेब सिरीजचे नाव ‘आझाद परिंदे’ होते.

सेजल शर्मा हीच्या निधनानंतर तिच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला होता. या मालिकेत आपल्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता अरु व्ही वर्मा यांनी सेजलच्या मृत्यूच्या बातमीवर दुःख व्यक्त केले होते. त्याचवेळी अभिनेत्री जॅस्मिन भसीन आणि मीरा दिओस्थले हीने देखील तिच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले होते.