अनेक जणांना सोडायचीय भाजपा, परंतु हे सांगून रोखले जाते की महाराष्ट्रातील सरकार पडणार : खडसे

मुंबई : भाजपाशी नाते तोडल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले की, ते भाजपाला दाखवून देतील की खडसे काय चीज आहे. त्यांनी म्हटले की, जेवढ्या निष्ठेने त्यांनी भाजपासाठी काम केले होते, तेवढ्याच निष्ठेने आता ते एनसीपीसाठी काम करतील. ते दुप्पट क्षमतेने एनसीपीच्या वाढीसाठी काम करतील.

एवढेच नव्हे, एकनाथ खडसे यांनी असेही म्हटले की, अनेक लोकांना भाजपा सोडायचा आहे, परंतु त्यांना हे सांगून रोखले जाते की, महाराष्ट्र सरकार पडणार आहे. मात्र, सत्य हे आहे की सरकार पडणार नाही.

खडसे यांनी म्हटले, मी 40 वर्षापर्यंत भाजपामध्ये राजकारण केले आहे, परंतु कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही आणि ना कधी कोणत्या महिलेचा आधार घेऊन वार केला आहे. जे आहे, ते आमने-सामने बोलून करतो. परंतु, येथे काही लोक महिलांचा आधार घेऊन वार करतात.

देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन खडसे यांनी आरोप केला आहे. खडसे यांनी एनसीपीमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यासपीठावरून म्हटले की, भाजपापेक्षा जास्त जागा एनसीपीसाठी निवडूण आणतील.

भाजपाचे डझनभर आमदार संपर्कात
भाजपा सोडून एनसीपीमध्ये सहभागी झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दुसर्‍या दिवशीच भाजपावर हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी मुंबईहून जळगावला जाताना त्यांनी म्हटले की, भाजपाचे एक डझनहून जास्त आमदार माझ्या संपर्कात आहेत, जे लवकरच एनसीपीमध्ये प्रवेश करतील. सोबतच प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी पलटवार केला आहे.

त्यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनण्यापूर्वी महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हते. शुक्रवारी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटले होते की, एनसीपी खडसेंना गोळी देते की चॉकलेट ते पहावे लागेल.

खडसे यांनी पलटवार करताना म्हटले की, खान्देशात भाजपाच्या नावावर नाही, तर 70 ते 80 टक्के मतं माझ्यामुळे मिळत होती. मी माझ्या सर्व समर्थकांशी चर्चा करून एनसीपीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माझे ते समर्थक आता एनसीपीमध्ये आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like