भयानक ! मुख्याध्यापकाकडून 2 चिमुकल्यांवर ‘लैंगिक’ अत्याचार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर मुख्याधापकाकडून लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. ही घटना तक्रारीनंतर उघडकीस आली. मुख्याधापक सतीश बजाईत याच्याविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. हि घटना वर्धातील भोसा भागातील आहे.

शाळेत शिकणाऱ्या 8 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. मुलींना सदर प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. आरोपीकडून हा घृणास्पद प्रकार तब्बल तीन महिन्यांपासून सुरु होता असे या तक्रारीत म्हणाले आहे. याप्रकरणी आता सिंदी पोलीस ठाण्यात या नराधम शिक्षकावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात कमल 376 (अ), (ब), पॉस्को कलम 6 अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम 354 (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणघाट परिसरातली महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच ही घटना उजेडात आल्याने लोक संपात व्यक्त करत आहेत. आरोपी शिक्षकावर अत्याचार आणि लैगिंक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यापासून शिक्षक असे अत्याचार करत होता. पीडितेनी घरी सदर प्रकरणाची माहिती दिल्यावर हे प्रकरण समोर आले असे पोलिसांनी सांगितले.