भारतीय लष्करातील जवानांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्करात वेगवेगळ्या धर्माचे लोक असून त्यांना देशभक्ती महत्वाची आहे. नमाज असो किंवा प्रार्थना असो भारतीय सैन्यदलातील जवान सर्वच धर्मांना समान वागणूक देतात. असाच एक सुंदर फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये हिंदू आणि मुस्लीम जवान आपआपल्या पद्धतीने धार्मिक प्रार्थना करताना दिसत आहेत.

माझ्या युनिटमधील 15 टक्के जवान मुस्लीम आहेत. येथे प्रत्येक पवित्र गोष्टीची सुरुवात मंदिरामधील पुजेने आणि मशिदीतील नमाज/दुवा सांगून केली जाते. दोन्ही धर्मांची प्रार्थनास्थळे एकाच छप्पराखाली असून त्याला ‘सर्व धर्म स्थळ’ असे नाव देण्यात आले आहे. असे एका जवानाने म्हटले आहे. जरी आम्ही सध्या कुठे आहोत हे सांगू शकत नसलो तरी माझ्या युनिटमधील या दोन जवानांचा फोटो शेअर करण्याचा मोह मला आवरला नाही. हे दोघेही आपआपल्या पद्धतीने धार्मिक नमन करत असून त्यांच्यात केवळ एक भिंत आहे, असे या इन्स्टाग्राम पोस्टसोबत जवानाने शेअर करण्यात आलेल्या डिस्क्रीप्शनमध्ये लिहिले आहे.

इन्स्टाग्रामच नाही तर ‘रेडइट’वरही हा फोटो व्हायरल झाला आहे. ही आपली एकत्रित ताकद आहे. विविधतेत एकता, अशा कॅप्शनसहीत हा फोटो रेडइटवर शेअर करण्यात आला आहे. ते दोघे एकाच खोलीमध्ये आहेत. दोघांमध्ये दिसणारा दुभाजक म्हणजे विंडो फ्रेम असून भिंत नाही. लोकांना ते वेगळे दिसत असले तरी ते एकत्र नाहीय असा त्याचा अर्थ होत नाही, अशी कमेंट एका रेडइट युझरने केली आहे.