‘स्पा सेंटर’ मध्ये मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश ; ‘तशा’अवस्थेत सापडले तरुण (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची राजधानी दिल्ली नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून चर्चेत असते. आताही महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी एका स्पा मध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उघड केले आहे. दिल्ली मधील नावाद येथील जास्मिन स्पा मध्ये एका शालेय मुलीसह २ पुरुष नग्न अवस्थेत आढळले आहेत. यावरून या स्पा मध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे समजून येत आहे. यासंदर्भातला व्हिडीओ स्वाती मलिवाल यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्यातून या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरु असल्याचे स्पष्ट होते.

किती विचित्र पुरुष आहेत, जे दुसऱ्यांच्या बहिणींचा आनंद घेत आहेत. पोलीस आणि एमसीडीच्या नाकाखाली असा व्यवसाय कसा काय वाढला..? यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न मलिवाल यांनी विचारला आहे. स्वाती मलिवाल याबाबतीत अतिशय सक्रिय आणि दक्ष असल्याचे दिसून येते. त्यांनी या पूर्वी अशा अनेक घटना समोर आणल्या आहेत. त्यांनी आणखी एका ट्विट मध्ये म्हटले आहे की, आम्ही जेव्हा स्पा मध्ये पोचलो तेव्हा तिथे अनेक कंडोमची पाकिटे दिसून आली. तसेच स्पा चा मॅनेजर आणि मुलींनी हे कबुल केले की, येथे सेक्स रॅकेट सुरु होते.

या नंतर स्वाती मलिवाल यांनी या संदर्भात कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार केली असून तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त