ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघातानंतर PM मोदी म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीचा दुपारी अपघात झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या गंभीर जखमी असल्याचं समजत आहेत. पिंपरी खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

शबाना आझमी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभर लोक प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आता यासंदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. लवकरच त्या बऱ्या व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो.” असं मोदी म्हणाले आहेत.

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत प्रार्थना केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “शबाना आझमी यांचा अपघात झाल्याचं कळल्यानंतर वाईट वाटलं. त्यांची प्रकृती लवकच सुधारावी यासाठी प्रार्थना करते.” असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शबाना आझमी यांची प्रकृती ठिक होण्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांनी प्रार्थना केली आहे. अनेकांनी ट्विट करत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी भावना व्यक्त केली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/