‘किंग’ खाननं सुरू केली ‘पठाण’ची शूटिंग ! चाहते म्हणाले ‘आ गया शेर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. शाहरुख खान सिद्धार्थ आनंद डायरेक्टेड (Siddharth Anand) पठाण (Pathan) या सिनेमात काम करताना दिसणार आहे. हा अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. यात अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) दिसणार आहे. या सिनेमात जॉन निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. शाहरुखनं सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

शाहरुखनं सुरू केली पठाणची शूटिंग

शाहरुख खानची दीर्घकाळानंतर वापसी पाहून आता चाहतेही काहीसे भावुक झाले आहेत. अनेकजण त्याला बेस्ट अ‍ॅक्टर म्हणत आहेत. शूटिंग सुरू होताच पठाण ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे. चाहते शाहरुखचं जोरदार स्वागत करत आहेत. काहींनी तर शाहरुखची तुलना थेट सिंहाशी केली आहे. काहींनी त्याच्या वापसीला वाघाची डरकाळी म्हटलं आहे. काही चाहते भावुक झाले आणि त्यांनी पठाणची शूटिंग सुरू होताच याला बॉलिवूडमधील नवं युग म्हणून संबोधलं आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की, राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाणमध्ये दिसणार आहे.

 

You might also like