2022 मध्ये शरद पवार बनु शकतात ‘राष्ट्रपती’, RSS शी संबंधित असलेल्या ‘यांनी’ सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. बातमी अशी आहे की 2022 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती होऊ शकतात असे संघाचे मोठे विचारवंत सांगत आहेत.

शरद पवारांचे मौन महाराष्ट्र सरकारला मान्य आहे
महाराष्ट्राच्या राजकीय विषयावर भविष्यवाणी सांगताना संघाचे विचारक दिलीप देवधर म्हणाले आहेत की, शनिवारी राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले त्यास शरद पवारांचीही मूक सहमती आहे. कारण, २०२२ मध्ये शरद पवारांना भाजपा एनडीएचे राष्ट्रपती उमेदवार बनवून भेट देऊ शकते.

सुप्रिया सुळेही मोदी मंत्रिमंडळात होणार सामील
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ४३ पुस्तकं लिहिणारे संघ विचारक दिलीप देवधर यांनी दावा केला आहे की, भाजपा शरद पवारांना २०२२ मध्ये एनडीए कडून राष्ट्रपती पदाचा दावेदार बनवू शकते. तसंच सुप्रिया सुळेंना देखील लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्रिपद देखील देऊ शकता.

संघातला एक गट राष्ट्रवादीत सामील झाल्याने आनंदित आहे
दिलीप देवधर असे सांगत आहेत की राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापनेत संघाचा एक भाग आनंदी आहे. शिवसेनेच्या आडमुठी वृत्तीने संघ संतप्त झाला आहे त्यामुळे बाहेरील लोक भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे असे संघास वाटते. बाहेरील लोकांचे संघटन नेहमीच स्वागतार्ह असते. कारण त्यात संघाचा विस्तार देखील होत असतो.

पवारांच्या कोणत्याही विधानात कोणतीही आक्रमकता नाही
दिलीप देवधर यांचे म्हणणे आहे की, विधानसभा निवडणुकीचा निकाल आला त्यानंतर शरद पवारांनी भाजपा वर त्यांच्या विधानातून कोणतीही नकारात्मकता आणि आक्रमकता दाखवली नाही.

जसे बिहारमध्ये घडले तसे महाराष्ट्रातही होऊ शकते
दिलीप देवधर यांचे म्हणणे आहे की बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्यासाठी नाराज असलेल्या नितीशकुमारांना भाजपबरोबर आणण्यासाठी रामनाथ कोविंद यांनी प्रयत्न केल्याने त्यांना राष्ट्रपती पदाची भेट मिळाली, तसेच शरद पवारांच्या बाबतीतही होऊ शकते.

शरद पवार म्हटले होते की, सोनिया इटलीची आहे …
अजित पवारांच्या प्रकरणात शरद पवारांच्या वृत्तीबाबत दिलीप देवधर म्हणाले की युतीचा एक धर्म असतो. त्याचे पालन करण्याचे आणि त्यामागे जाण्याचे नाटक देखील करावे लागते. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की शरद पवार यांनी सोनिया यांना इटलीमधील रहिवासी म्हणवून कॉंग्रेसला तोडत स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष निर्माण केला आहे.

२०१४ मध्ये एनसीपी ने भाजपाला दिले होते समर्थन
दिलीप देवधर म्हणतात की शरद पवार हे खूप हुशार राजकारणी आहेत. २०१४ ला न मागता त्यांनी भाजपाला पाठिंबा देऊन सरकार बनवले होते. यातूनच शिवसेना कमकुवत झाली. यावेळी शरद पवार एका नव्या फॉर्म्युल्यासह राजकारण करीत आहेत.

Visit : Policenama.com