‘CAA’, ‘कॅग’चा अहवाल आणि ‘एल्गार’ परिषदेबाबत शरद पवारांनी मांडले ‘हे’ 15 महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकत्व कायदा(CAA), कॅगचा अहवाल तसेच एल्गार परिषदेवर झालेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना पवारांनी इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 15 महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

1) नागरिकत्व कायदा म्हणजे अर्थव्यवस्था संकटात आहे हे लपवण्यासाठी हा सरकारचा कट आहे.
2) फक्त तीनच देशांचा विचार का, बाकीच्यांचा का नाही.
3) देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी.
4) केंद्रात आणि राज्यात फूट पाडण्याचं काम सुरु आहे.
5) देशातील सामाजिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता.
6) कॅगचा अहवाल अंत्यंत गंभीर.
7) 66 हजार कोटींच्या खर्चाचा मेळ लागलेला नाही. देशात सध्या वेगळंच चित्र दिसतंय.
8) कॅग अहवालाबाबत चौकशी करून सरकारनं वस्तूस्थिती जनते समोर मांडावी.
9) एल्गार परिषदेच्या भाषणावरून आणि कवितांवरून त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं.
10) समाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवणं चुकीचं.
11) सत्तेचा गैरवापर करत साहित्यिकांवर कारवाई का?
12) पुणे पोलिसांचं वागणं अत्यंत आक्षेपार्ह.
13) पोलिसांनी मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली.
14) पुणे पोलिसांनी सूड भावनेनं कारवाई केली असं दिसतंय.
15) त्यांनी टीका केली म्हणजे ते देशद्रोही आहेत असं म्हणणं चुकीचं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/