शरद पवारही वापरणार मोदींचा ‘हा’ फॉर्मुला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसत आहे. एकाचवेळी 10 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार संवाद साधणार आहेत.

आगामी निवडणुका अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन करत आहेत. अश्याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही एकाचवेळी 10 लोकसभा मतदारसंघातल्या बूथ प्रमुखांशी संपर्क साधणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, सातारा, ईशान्य मुंबई, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, रावेर, जळगाव या महासंघातील पदाधिकाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ काँग्रेसने अजून राष्ट्रवादीसाठी सोडलेला नाही. तरीही औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे.

विशेष म्हणजे निवडणुका अवघ्या काही दिवसंवर येऊन ठेपली आहे. यावेळी प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांना जाणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करण्याचा मार्ग राष्ट्रवादी काँग्रेसने निवडला आहे.

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी भाजपकडून हायटेक प्रचाराचा मार्ग अवलंबला होता. आणि आता हाच प्रचाराचा मार्ग शरद पवार अवलंबणार आहेत. यामध्ये कार्यकर्ते शरद पवारांना मनातील प्रश्न आणि अडचणी सांगू शकतात.