Sharad Pawar VS Ajit Pawar | अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा होणारच, धनंजय मुंडेंची माहिती

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar VS Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी (Rebellion in NCP) झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. नुकतीच त्यांनी बीड येथे सभा घेतली होती. शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवार यांची उत्तर सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही सभा रद्द होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. (Sharad Pawar VS Ajit Pawar) यावर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवार यांची बीड येथे उत्तर सभा होणार असल्याचे सांगितले आहे.

बीड येथे झालेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी धनंजय मुंडे, अमरसिंह मुंडे (Amar Singh Munde) या अजित पवारांच्या गटातील नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवार उत्तर सभा घेणार आहेत. परंतु ही सभा रद्द होणार असल्याची चर्चा होती. मात्र ही सभा होणार असून येत्या 27 ऑगस्टला अजित पवारांची सभा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. उत्तर सभेतून धनंजय मुंडे अथवा अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. (Sharad Pawar VS Ajit Pawar)

धनंजय मुंडे यांनी काय केलं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा (Ajit Pawar Rally) रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत,ही विनंती, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

अजित पवारांची 27 तारखेला उत्तर सभा

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीड सभा झाल्यानंतर त्याला उत्तर देणारी सभा ही बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड वरती येत्या 27 तारखेला होणार आहे. ही सभा होणार नसल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती.
मात्र, या संर्भात धनंजय मुंडे यांनी सभा होणार अशी भूमिका जाहीर केल्यानंतर
बीडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण (Rajeshwar Chavan) यांनी देखील अजित पवारांची
नियोजित सभा होणारच असल्याचे सांगितले.
तसेच या सभेला मंत्रिमंडळातील नऊ मंत्री येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी