अन् मैत्रणीमूळे ती पुन्हा शाळेत आली… पोलीस काकांच्या प्रयत्नमुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेत येण्यासाठी ती हडपसर ते लष्कर पीएमटी प्रवास करायची, पन एक मुलगा तिची छेड काढत असे. तिने पालकांना हे सांगितले, मात्र पालकांनी तिची शाळाच बंद केली आणि ती शाळेत येईनासी झाली. यावेळी तिच्या मैत्रिणी मदतीला धावून आल्या आणि त्यांनी पोलीस काकाला ही कहाणी सांगितली. लष्कर पोलीस काकांनी तिची अडचण सोडून पुन्हा तिची शाळा सुरू केली.

लष्कर भागातील एका कॅम्प एज्युकेशन शाळेत (मुलींची शाळा) येथे ही मुलगी 8 वीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान ती राहण्यास हडपसरमधील वैदूवादी परिसरात आहे. तिचे पालक कामे करतात. गरीब कुटुंब आहे. मुलगी अभ्यासात हुशार आहे. ती दररोज हडपसरवरून शाळेत पीएमटीबसने येत असे. मात्र, यादरम्यान तिला एक मुलगा सतत त्रास देत होता. तिने हे सगळं पालकांना सांगितले. मात्र, पालकांनी तिला बळ देऊन मुलाला जाब विचारण्यापेक्षा मुलीचीच शाळा बंद केली. तसेच तिला शाळेत जाऊ नये म्हणून संगितले. काही दिवस ती शाळेत येत नसल्याने तिच्या काही मैत्रनींनी ही माहिती प्राचार्यांना दिली. त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस काका रितेश काळे यांना बोलून घेतले व त्यांना या मुलींची भेट घालून दिली.

काळे यांनी मुलींकडे विचारपूस केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. यानंतर काळे यांनी मुलीच्या पालकांना विश्वस्त घेऊन त्यांना प्रथम धीर दिला. त्यांना मुलीला शाळेत पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर काळे आणि त्यांचे सहकारी यांनी वैदुवादी पीएमटी बस स्थानकावर साध्य गणवेशात मुलाची वाट पाहिली. तो येताच वर्णनावरून त्याला पकडले. त्याचा फोटो काढून त्यांना मैत्रनींना पाठवून तोच आहे का याची खात्री केली. तोच असल्याचे समजल्यानंतर मुलाला पोलीस ठाण्यात अनण्यांत आले. त्यानंतर त्याच्या पालकांना बोलवून घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवत समज दिली. त्याच्या पालकांना बोलवून त्यांनाही लक्ष ठेवण्यास सांगितले.

त्यानंतर ती पुन्हा शाळेत आली. तिच्या मैत्रिणी आनंदी झाला व तिने आणि शाळेने पोलीस काका यांचे आभार मानले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like