IPL : नॉटआऊट असूनही धवनने नाही घेतला DRS, युवराज सिंहने केले ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाईन : आयपीएल – 13 क्वालिफायर – 2 मध्ये रविवारी दिल्लीच्या राजधानीचे सलामीवीर शिखर धवनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 78 धावा केल्या, पण तो ज्याप्रकारे आउट झाला, त्यावर रिव्ह्यू न दिल्याबद्दल त्याच्यावर टीका केली जात आहे. 19 व्या ओव्हरमध्ये तिसर्‍या चेंडूवर धवनला संदीप शर्माने LBW आउट केले. धवनला वाटले की, चेंडू थेट त्याच्या पॅडवर लागला आहे आणि तो विकेटसमोर आढळला, परंतु जेव्हा तो बाउंड्रीच्या जवळ पोहोचला, तर त्याला असे वाटले कि, तर त्याने रिव्यू घ्यायला हवा होता. धवनने जर रिव्ह्यू घेतला असता तर तो वाचू शकला असता, रिप्लेमध्ये कळाले कि, चेंडू स्टंपला लागला नाही. सामन्यानंतर माजी भारतीय संघाचा अष्टपैलू युवराज सिंगने रिव्ह्यू न घेतल्यामुळे धवनला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

युवराजने ट्विटरवर लिहिले की, ‘गोलंदाजांनी शेवटच्या दोन षटकांत शानदार पुनरागमन केले. एकही बाउंड्री लागली नाही. नटराजन आणि संदीप शर्मा कौतुकास पात्र आहेत. दबाव असणाऱ्या सामन्यात चांगले काम केले. शिखर धवन फॉर्ममधील माणूस, पण नाव जट्ट जी आहे. डीआरएसचे काय भाऊ. नेहमीप्रमाणे विसरला असशील. धवनने देखील युवराजच्या बोलण्याला पंजाबी भाषेत उत्तर देत सोमवारी म्हटले की, ‘पाजी, मला वाटले आउट आहे, तेव्हाच मी बाहेर जाऊ लागलो. पण जेव्हा मी बाउंड्री वर पोहोचलो तेव्हा मला कळले.’

धवनच्या अर्धशतकामुळे दिल्लीने तीन विकेटवर 189 धावा केल्या आणि त्यानंतर हैदराबादला आठ बाद 178 धावांवर रोखले आणि सामना 17 धावांनी जिंकला. मंगळवारी अंतिम सामन्यात दिल्लीचा चार वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी सामना होईल.