वरिष्ठांच्या कारवाईनंतर शिक्रापूर पोलिस खडबडून झाले जागे, 6 दारूच्या अड्डयांवर छापे

शिक्रापूर  : प्रातिनिधी –  शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका ठिकाणी हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी कारवाई केल्यानंतर शिक्रापूर पोलीस खडबडून जागे झाले असून आता शिक्रापूर पोलिसांनी सहा ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापे टाकून कारवाईस जोरदार सुरवात केली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकणरोड लगत असलेल्या साई करुणा हॉटेल येथे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी कारवाई करून दारू जप्त केली होती, त्यांनतर डीवायएसपीच्या कारवाईचा शिक्रापूर पोलिसांनी चांगलाच धसका घेतला त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस नाईक अनिल जगताप, हेमंत इनामे, किशोर शिवणकर, प्रताप कांबळे, आनंदा बाठे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापासत्र सुरु करून कारवाया सुरु केल्या त्यांनतर सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिराजवळ, चाकण रोड चौफुला हॉटेल ग्रीन पोईंट, शिक्रापूर येथील हॉटेल गंधर्व, सणसवाडी येथील हॉटेल श्रद्धा, धामारी व तळेगाव ढमढेरे येथे कारवाई करत एकूण २८४०० रुपयांची दारू जप्त करून अनुक्रमे सुनील शामराव सरदार रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे, संदीप वसंत गायकवाड रा. काळूस ता. खेड जि. पुणे, तानाजी मनदेव मोरे रा. कळमकर वस्ती शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, रोहन दत्तात्रय ढमढेरे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे, चंद्रकांत नामदेव गायकवाड रा. धामारी ता. शिरूर जि पुणे, भीमराज बाबुराव ढमढेरे रा. काटे आळी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे यांच्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.परंतु आता या कारवाईत सातत्य राहणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करणे भाग पडेल.