शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे ‘मापाडी अँड्रॉइड ॲप’ ! शेतकऱ्यांना होणार फायदा

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) – शेतकऱ्यांच्या मालाची आवक, त्याच्या मालाला भेटलेला बाजार भाव, त्याच्या मालाचे योग्य वजन आणि आणि त्याला मिळणारी एकूण रक्कम आता एका क्लिक मध्ये शेतकऱ्याला त्याच्या अँड्रॉइड मोबाईल वर मिळणार असून यासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने “मापाडी अँड्रॉइड ॲप” सुरू केले असल्याची माहिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकरराव जांभळकर यांनी दिली आहे. यामुळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढील काळात शेतकरी व्यापारी यांच्यात पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न असून डिजिटल ॲप करणारी राज्यातील दुसरी बाजार समिती म्हणून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख होणार आहे.शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डिजिटल माथाडी ॲप नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत मापाडी पावती पुस्तकातून पावती बनवत असल्याने त्यामध्ये खाडाखोड होणे किंवा बाजारभाव स्पष्ट न दिसणे या समस्या आता राहणार नाही एकूण वजनामध्ये पारदर्शकता नव्हती तसेच बऱ्याच माला सोबत शेतकरी येत नसल्याने त्यांना घरबसल्या त्यांच्या मालाची झालेली आवक आणि त्यांना मिळालेला भाव समजत नसते आता या मापाडी ॲपद्वारे पावती झाल्यानंतर शेतकऱ्याला लगेच एसएमएस’द्वारे ही माहिती त्याला मिळालेला बाजार भाव एकूण वजन व एकूण सर्व रक्कम एका क्लिक मध्ये त्याला घरबसल्या ही उपलब्ध होणार आहे पावती च्या स्वरूपात ही माहिती मोबाईलवर शेतकऱ्यासाठी उपलब्ध होऊन त्याचा टोकन नंबर त्याबरोबर असणार आहे. अनेक वेळा शेतकरी आला नसेल तर त्याला नक्की किती बाजार भाव मिळाला हे समजत नव्हते परंतु आता एकदा बाजार भाव, एकूण वजन तयार होताच त्याला याबाबतची माहिती मिळणार आहे.

या ॲप चा वापर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तील नवीन मार्केट यार्ड शिरूर येथील कांदा मार्केट, पिंपळे जगताप येथील उपबाजार ,भाजीपाला तरकारी मार्केट तसेच मुख्य याड शिरूर व उपबाजार तळेगाव ढमढेरे येथील भुसार धान्य मार्केट येथे मापाडी व कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. तसेच शिरूर येथील शेळी मेंढी बाजार व तळेगाव ढमढेरे येथील शेळी मेंढी बाजार येथे या या ॲपचा उपयोग होणार असल्याचे सभापती शंकरराव जांभळकर यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना बाजार विषयक सर्व माहिती ती घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे तसेच शेतमालाचे वजन अचूक होऊन त्याची माहिती लगेच त्यांना कळणार असून शिवाय कृषी विषयक सर्व सल्ला घरबसल्या मिळणार असल्याचे हे ॲप रिफॉरमिस्ट इंडिया आयटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने बनवले असल्याचे जांभळकर यांनी सांगितले. यावेळी सभापती शंकरराव जांभळकर उपसभापती विकास आबा शिवले संचालक अॕड.वसंतराव कोरेकर , प्रवीण चोरडिया ,बंडु जाधव , व सचिव अनिल ढोकले व संचालक मंडळ उपस्थित होते.