पत्नी बाळंतपणाला माहेरी गेल्यावर पोलिसाची आत्महत्या

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नी बाळंतपणाला गेल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामेश्वर पुंडलीक नागीमे (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नागीमे हे शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत रामेश्वर नागीमे यांची पत्नी बाळंतपणासाठी गेली आहे. त्यांनी राहत्या घरात रात्री साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

रामेश्वर नागीमे हे गेल्या चार वर्षापासून शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते भाड्याच्या घरात राहात होते. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली असताना रात्रीच्या सुमारास त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत.