शिरूरमध्ये भाजपाकडून ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ आंदोलन

शिरुर  : प्रतिनिधी  –  महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार शिरुरला राज्य शासनाच्या विरोधातील मेरा अंगण मेरा रणांगण आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी चव्हाणवाडी येथे आपल्या घराच्या अंगणात आंदोलनात सहभाग घेतला .

यावेळी पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे ,शिरुर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे आदी होते .

माजी आमदार पाचर्णे म्हणाले की राज्य शासना कडून जनतेला कोणत्याही प्रकारचे साह्य होत नाही राज्य शासन केंद्र शासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याची टीका ही पाचर्णे यांनी केली .

ॲड .खांडरे म्हणाले राज्य शासन हे निष्क्रिय आहे . कोरोना योध्दांवर हल्ले करणाऱ्यान विरोधात कारवाई झालेली नाही . कोरोनाग्रस्तांवर मोफत ईलाज करण्याची घोषणा झाली .पण कोरोनाग्रस्ताना मदत झाली नाही .त्याच प्रमाणे कोरोनाचा काळात शेतक- यांवर खटले दाखल केले आहेत . याप्रकरणीभाजपा शेतकऱ्यांच्या मागे भर भक्कमपणे उभा राहणार असल्याचे खांडरे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like