डॉक्टरला खंडणी मागितल्या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका माजी सरपंचावर खंडणीचा गुन्हा दाखल

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील डॉक्टर व्यावसायिक रामेश्वर विठ्ठलराव बंडगर यांच्याकडे गावात दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला २५००० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर दवाखाना चालू देणार नाही असे म्हणून पैसे मागणाऱ्या शिक्रापुरच्या माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर विठ्ठलराव बंडगर ( वय वर्षे २८ राहणार माळीमळा शिक्रापूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. दिनांक २४ रोजी शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून तुला शिक्रापूर गावच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला पंचवीस हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुला मी दवाखाना चालू देणार नाही गावातील लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला लावू गावामध्ये फक्त माझे राज्य आहे. अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली याबाबत रामेश्वर बंडगर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा,पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर, हे करीत आहेत. अशा प्रकारे आणखी कोणास खंडणीची मागणी होत असल्यास लोकांनी निर्भयपणे शिक्रापुरः पोलीस ठाणेस फोन क्र.0213728633 यावरती संपर्क करावा असे आवहान शिक्रापुर पोलीस ठाणे तर्फ करण्यात आले आहे.