Shirur Lok Sabha constituency | अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार? शिरूर लोकसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची जोरदार चर्चा, पूर्वा दिलीप वळसे-पाटीलही तयारीत?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shirur Lok Sabha constituency | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) याला शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha constituency) संधी दिली जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे आंबेगाव तालुक्याचे (Ambegaon Taluka) गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करणारे आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीही आपली मुलगी पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) हिला आमदारकीसाठी उतरवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. पण शिरूर मतदारसंघातून पार्थ पवार यांना तिकीट मिळाले, तर खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचे काय होणार, हा प्रश्न आता उभा राहिला आहे. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

 

भाजपचे केंद्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda BJP) यांनी मागे एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते, देशात आता कोणतेच पक्ष शिल्लक राहणार नाहीत. भाजप हा एकमेव पक्ष देशात राहणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकादेखील केली होती. पण, त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना फोडून त्यांनी एकप्रकारे महाराष्ट्रातील महत्त्वाचा मोठा पक्ष शिवसेना संपविला आहे. आता त्यांचा डोळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गड किल्ल्यावर आहे. शिरूर आणि बारामती तालुक्यात (Baramati Tluka) भाजपने लक्ष घातले आहे. त्यांना इथून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) उखडून फेकायचे आहे. (Shirur Lok Sabha constituency)

त्यामुळे शिरूर आणि बारामती तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी लढत होणार आहे.
अमोल कोल्हे पक्षांतरदेखील करू शकतात. त्यांना पक्षाने तिकीट न दिल्यास ते शिंदे गटात जाण्याचीदेखील शक्यता आहे.
पण, शिंदे गट त्यांना तिकीट देईल का, याबद्दलदेखील साशंकता आहे.
त्यामुळे आगामी काळात अमोल कोल्हे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 

Web Title :- Shirur Lok Sabha constituency | shirur lok sabha constituency ajit pawar son parth pawar dilip walse patil daughter purva ncp mp dr amol kolhe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय