मतांसाठी काय पण ! हिंदू परिसरात ‘दीपाली’ तर मुस्लिम भागात ‘सोफिया’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवार जोरात प्रचार करत असून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन उपाय वापरत आहेत. यामध्येच शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी देखील नवीन फंडा वापरला आहे.

हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ती वेगवेगळ्या नावांनी प्रचार करत आहे. ठाण्यातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ती शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. हिंदुबहुल भागामध्ये ती दीपाली सय्यद या नावाने प्रचार करत आहे तर मुस्लिमबहुल भागात ती सोफीया सय्यद या नावाने प्रचार करताना दिसून येत आहे. मराठी सिनेमात काम करणारी हि अभिनेत्री तिचे मूळ नाव दीपाली भोसले असे आहे. लग्नानंतर  तिने आपले नाव दीपाली सय्यद ठेवले आहे. याविषयी तिने सांगितले कि, नावाच्या बदलामुळे मोठा फरक दिसून येत आहे. ज्या भागात जाते त्याप्रमाणे मी नाव बदलून प्रचार करत आहे.

दरम्यान, 2014 मध्ये तिने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी तिचा पराभव झाला होता.

visit : policenama.com