संजय राऊत पुन्हा एकदा शरद पवारांना दिल्लीत भेटले, 10 मिनिटं खलबतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्तास्थापनेवरुन खलबतं सुरु आहेत. ही खलबतं आता राज्यासह दिल्लीत पाहायला मिळत आहेत. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेत आहेत. परंतू पवारांच्या मते अजून सरकार स्थापन करण्याबाबत आणि शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत ठरले नाही. असे असेल तरी आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली.

एकीकडे शरद पवार शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरले नाही असे सांगत असताना राज्यातील खलबतं दिल्लीत सुरु आहेत. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली त्यामुळे हे सिद्ध होते की खलबत शांत झालेली नाहीत. पवार आणि राऊत यांच्या अवघ्या 10 मिनिटांच्या बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे कळते आहे.

हिवाळी अधिवेशनामुळे राज्यातील सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. या दरम्यान पवार आणि सोनिया गांधी यांच्या देखील राज्यातील परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या गाठी भेटी झाल्या. या भेटी तशा अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर कोणतीही चर्चा झाली नाही असे पवारांनी सांगितले खरे परंतू आज सलग दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Visit : Policenama.com