‘तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर’, संजय राऊतांचा BJP ला टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडले. विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर यावर चर्चा सुरु झाली असून या चर्चेनंतर मतदान होणार आहे. राज्यसभेत विधेयक मांडताना अमित शहा यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. लोकसभेत शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी राज्यसभेत बिलाला विरोध करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना अमित शहांना चांगलेच टोले लगावले. त्यावेळी त्यांनी एक शेरही ऐकवला.

अमित शहा यांच्याकडे बघून संजय राऊत म्हणाले, “हिंदुत्वके जिस स्कूल मे आप पढते हो हम उस स्कूल के हडमास्टर है”. बाळासाहेब ठाकरे, श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी हे त्या शाळेचे मुख्याध्यापक राहिले आहेत. तसेच या विधेयकावर ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंकांचे निरसन केले जावे असेही त्यांनी सभागृहात म्हटले.

संजय राऊत पुढे म्हणाले, या विधेयकाला काही लोक विरोध करताहेत तर काहींनी त्याचं समर्थन केलंय. विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मात्र, त्या प्रत्येकेला देशद्रोही म्हणण योग्य नाही. तुमच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नसल्याचे सांगत हिदुत्ववादाबद्दलची आमची भूमिका ही जाहीर आहे. ती आजही कायम असून आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ही पाकिस्तानची संसद नाही, असे राऊत म्हणाले.

Visit : policenama.com