PM मोदींच्या दिवे प्रज्वलित करण्याच्या ‘आवाहना’वर संजय राऊतांची टीका, म्हणाले – ‘लोकांनी आपलं घर जाळू नये’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी देशातील जनतेला 5 एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजता आपआपल्या घराची लाईट बंद करुन दिवे, मेणबत्त्या आणि मोबाईल फ्लॅश लावण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांना पंतप्रधान मोदींचे हे आवाहन समजले नाही त्यामुळे त्यांनी त्याची खिल्ली उडविली आहे. राऊत यांनी ट्वीट केले की, ‘जेव्हा लोकांना टाळ्या वाजवण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी रस्त्यावर जमा होऊन ढोल वाजवले. आता मी अशी अपेक्षा करतो की, आता त्यांनी त्यांचे स्वत: चे घर जाळू नये. ”

पंतप्रधान मोदींचे आवाहन काय होते
पंतप्रधान मोदींनी लोकांना आवाहन केले की, ‘या रविवारी, 5 एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान करायचे आहे, त्याला प्रकाशाच्या शक्तीची ओळख करुन द्यायची आहे. 5 एप्रिल रोजी आपण 130 कोटी देशवासीयांच्या महासत्तेला जागृत केले पाहिजे. घराच्या दाराजवळ किंवा बाल्कनीमध्ये घराचे सर्व दिवे बंद करुन आणि उभे राहून 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाइल फ्लॅशलाइट लावा. जेव्हा प्रत्येकजण आपआपल्या घराबाहेर दिवा घेऊन उभा राहिल, तेव्हा त्या प्रकाशाच्या महाशक्तीची जाणीव होईल, आपण सर्व एकाच हेतूसाठी लढत आहोत, ते प्रगट होईल. ”

पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर कॉंग्रेस पक्षाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॉंग्रेसने म्हटले की, दिवे पेटतील पण देशातील गोरगरीबांची चूल कधी पेटणार? पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, पक्ष दिवा जाळण्याच्या विरोधात नाही. पण गरीबांची चूल कधी पेटणार? खेडा म्हणाले की, पंतप्रधान, डॉक्टर, नर्स, सुरक्षा कर्मचारी यांच्या समर्थनार्थ दीप प्रज्वलित करण्याविषयी मोदी बोलत आहेत, पण त्यांच्या सुरक्षेचे काय? देश अशी आशा करत होता की, पंतप्रधान आपल्या भाषणात, शेतकऱ्यांच्या जन-धन खात्यात, निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यात 7500 रुपये आणि मनरेगा कामगारांच्या खात्यात 3 महिन्यांची आगाऊ रक्कम देण्यासंबंधी घोषणा करतील. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवर बोलतील. पण असे काही बोलले नाही. यामुळे देशातील जनतेला पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींविषयी निराशा वाटली आहे.