शिवसेनेचा मोदी सरकारवर टीकेचे बाण; म्हणाले – Facebook, ट्विटर, WhatsApp वर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक पातळीवर हिंदुस्थानातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब मारली जात आहे. त्यासाठी ट्विटर या माध्यमाचा वापर करण्यात आला त्यामुळे दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच मध्यरात्री पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे सध्या विचार सुरु आहे. हे करण्यासाठी थोडं थांबायला हवं. जर फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंद सोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार? असा टोला (shiv sena) शिवसेनेने (shiv sena)  लगावला आहे. शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहे.

देशातील सामान्य जनतेला मेहुल चोक्सी कोण व त्याचे काय झाले याबाबत काही पडलेले नाही. आपल्या देशात चोक्सीला ‘डॉमिनिकन’ देशांत कुठेतरी बेडय़ा ठोकल्याचा आनंद उत्सव साजरा केला जाईल. पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळय़ातील मेहुल हा एक आरोपी आहे. लंडनच्या तुरुंगात मुख्य आरोपी नीरव मोदी आहे. त्यालाही परत आणण्यासंदर्भात लंडनच्या कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे.

स्टेट बँकेसह अनेक वित्तीय संस्थांना आठ-दहा हजार कोटींचा गंडा घालणारे दुसरे एक महाशय विजय मल्ल्या हेदेखील लंडनच्या रस्त्यावर फिरत आहेत. त्यांनाही देशात आणण्यासाठी लंडनच्या कोर्टात झगडा सुरु आहे. मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारखे अनेक लोक गेल्या काही वर्षांत देश सोडून पळाले आहेत. आयपीएल क्रिकेट सोहळय़ाचे कर्तेसवरते ललित मोदी हे सुद्धा आर्थिक घोटाळय़ांच्या आरोपांमुळे पळून गेले आहेत व युरोपातील देशात त्यांचा वावर मस्त सुरू आहे. त्यांचा कोणी ‘बालही बांका’ करू शकलेले नाही. नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या हे तर भाजप सरकारच्या काळातच पळून गेले आहेत. कोणीतरी आतून मदत केल्याशिवाय त्यांना असे पळून जाणे शक्य आहे काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

यातील प्रत्यक जण सांगत आहे कि आम्ही प्रखर राष्ट्रभक्त असून जाणीवपूर्वक कोणताही घोटाळा झाला नाही. आम्ही सिस्टीम आणि राजकारणाचे बळी आहोत. काही दिवसापूर्वी मल्ल्या यांनी पैसे परत करण्याचा प्लॅनही दिला होता. मल्ल्या, मोदी वगैरेंची संपत्ती जप्त केली गेली आहे. मल्ल्या यांचे म्हणणे असे की, जी जप्त केली आहे त्याची किंमत हि बुडविलेल्या कर्जापेक्षा अधिक आहे. मल्ल्याच नाही तर पळून गेलेल्या प्रत्येक उद्योगपतीचे म्हणणे असेही आहे की, हिंदुस्थानातील माहोल व्यापार-उद्योग करण्यालायक राहिलेला नाही. मल्ल्या वगैरे लोक आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवणार? मात्र एकेकाळी या सर्व भगोडय़ांचे देशाच्या ‘जीडीपी’त महत्त्वाचे योगदान होतेच.

 

‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा

हिरे व्यापाऱ्यात नीरव मोदीचे नाव मोठेच होते. तसे मद्य, स्पिरिट, हवाई वाहतूक क्षेत्रांत मल्ल्याने उंच झेप घेऊन नागरी हवाई उड्डाण व्यवसायाला नवी दिशा दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती याच काळात इतक्या वाढल्या की, विमान कंपन्या साफ कोसळून गेल्या. नरेश गोयल यांच्या ‘जेट’ विमान कंपनीनेही प्राण सोडला. यापैकी अनेक विमान कंपन्यांना जगवता आले असते, पण वेळीच प्राणवायू मिळू दिला गेला नाही. या क्षेत्रातील जाणकार सांगतात की, कोणाच्या तरी राजकीय वरदहस्ताखाली चालणाऱ्या विमान कंपन्यांना बळ देण्यासाठीच या जुन्याजाणत्या विमान कंपन्यांना कोंडीत पकडून उतरविण्यात आले व भंगारात ढकलले गेले. यातून विमान वाहतूक क्षेत्राला आर्थिक फटका बसलाच, पण त्यापेक्षा बेरोजगारीचे संकटही निर्माण झाले, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

गेल्या सात वर्षांत देशातील किमान 10 हजारांवर कोटय़धीश उद्योगपती, व्यापारी मंडळींनी स्वदेश सोडून इतर देशात जाऊन बस्तान बसवले आहे. यात अनेक जणांची गणना नामवंतांत होते व त्यांनी कोणताही आर्थिक घोटाळा केलेला नाही. केवळ देशात आर्थिक व औद्योगिक मोहोल ठीक नसल्याचे कारण देत असतील तर गाजावाजा केलेल्या स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत वगैरे खेळांचा काय निकाल लागला? नवे उद्योग, नवी गुंतवणूक आलीच नाही. उलट जी होती तीसुद्धा गेली.

जे पंडित नेहरूंच्या काळात मेहनतीने अनेक सार्वजनिक उपक्रम, उभारले गेले, ते सर्व उद्योग विकले जात आहेत किंवा नव्या ईस्ट इंडिया कंपनीला चालवायला दिले गेले आहेत. जाणीवपूर्वक एअर इंडियाचा बाजार उठवला गेला. भारतीय रेल्वे भविष्यात आपली राहणार नाही. पडद्यामागून तेल कंपन्यांचे सौदे सुरू आहेत. बाजूची चीन, बांगलादेशसारखी राष्ट्रे त्यांचे ‘जीडीपी’, दरडोई उत्पन्न वाढवत आहेत, पण हिंदुस्थानात कोरोनामुळे ‘डोकी’ कमी करण्याचा खाटीकखाना उघडला आहे अशी खरमरीत टीका शिवसेनेने अग्रलेखात केली आहे.

 

Also Read This : 

 

WTC 2021 फायनलच्या पूर्वी सरावाच्या मॅचमध्ये न्यूझीलँडने दाखवला ‘जोश’, टीम इंडियाला दिला ’इशारा’

 

‘या’ लोकांनी चुकून देखील जवसाचं सेवन करू नये, फायद्याच्या जागी होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

 

फॅफ ड्यू प्लेसिस अन् ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय ! जाणून घ्या कोणाचं वाढलं ‘टेन्शन’

 

जायफळ खाण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारी फायदे, तुम्हालाही येईल उपयोगात

 

मुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांत तुफान ‘राडा’; मनसे पदाधिकार्‍याच्या डोळ्याला गंभीर दुखापत