भाजपाला अप्रत्यक्षपणे केलेली मदत तानाजी सावंतांना भोवणार ?

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच उस्मानाबाद जिल्हापरिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक राजकीय डावपेच खेळण्यात आले असून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत भाजपाला मदत केली होती. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज होते. त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात न आल्याने त्यांनी हे सुडाचे राजकारण केले असे समोर येत होते. दरम्यान त्यांना ही बंडखोरी खूप महागात पडली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची देखील त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी याबाबत सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे पदाधिकारी एकवटले असून ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची देखील त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. लक्ष्मीकांत पाटील यांच्या जागी आता पुरुषोत्तम बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तानाजी सावंत हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते. आपली नाराजी देखील त्यांनी उघडपणे बोलून दाखविली होती. अशातच उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. यात तानाजी सावंत यांनी आपल्या पुतण्याला महाविकास आघाडीतर्फे उपाध्यक्ष पद दिले जावे यासाठी कंबर कसली परंतु तसे न झाल्याने तानाजी सावंत यांनी बंडखोरी करून भाजपाला मदत केली होती.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/