देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ‘शिवसैनिक’च मुख्यमंत्री होणार ! ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात युती सरकारकडे बहुमत असूनही शिवसेनेसोबत मतभेद झाल्याने भाजप ने अद्याप सत्ता स्थापनेवर दावा केलेला नाही त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चाललेला आहे. मात्र भाजप अल्पमताच सरकार बनवणार नाही, त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शिवसेना मात्र मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेली आहे त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, युतीचे सरकार यावे ही भाजपची देखील इच्छा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार आहे, असा टोमणा देखील मुनगंटीवर यांनी शिवसेनेला लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्याने शिवसेना भाजपवर वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि सत्तेमध्ये समान हिस्सा मागत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कायम मार्गदर्शक राहिलेले आहेत. यामुळे शिवसेनेशी चर्चा सुरु आहे तसेच लवकरच राज्यपालांशी भेटून सत्ता स्थापनेचा दावा करू असं देखील मुनगंटीवार यांनी सांगितले.

जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला असल्याने आम्ही विरोधात बसू अशी भूमिका शरद पवारांनी घेतली असली तरी काँग्रेस मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सेना भाजप सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like