शिवम दुबेनं मोडलं स्टुअर्ट बिन्नीचं ‘रेकॉर्ड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचा अष्टपैलू शिवम दुबेने एका षटकात 34 धावा दिल्या. हा एक नवा रेकॉर्ड आहे. दुबे दहाव्या ओव्हरसाठी आला ज्यात रॉस टेलर व टिम सेफर्टने चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यामधील हा दुसरा सर्वात महागडा ओव्हर ठरला. सर्वात महागड्या ओव्हरचा विक्रम स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे, ज्यात एका षटकात भारतीय स्टार युवराज सिंगने 2007 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये सहा षटकार ठोकले होते.

भारताकडून सर्वात महागड्या ओव्हरची नोंद दुबेच्या नावावर झाली आहे. त्याने स्टुअर्ट बिन्नीचा विक्रम मोडला, ज्याने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या षटकात 32 धावा दिले होते. कोणत्याही एका ओव्हरमध्ये 30 पेक्षा जास्त धावा दिल्यानंतरही विजय नोंदविणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. एवढेच नव्हे तर पाच सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करणाराही तो पहिला संघही ठरला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने दहावी द्विपक्षीय टी -२० मालिका जिंकली. जो एक नवा विक्रम आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने नऊ वेळा अशी कामगिरी केली आहे. घरच्या मैदानावर टी-20 मध्ये न्यूझीलंडचा हा 23 वा पराभव आहे. अशाप्रकारे, त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावलेल्या संघांपैकी ते श्रीलंकेच्या बरोबर पोहोचले आहेत.