सत्तास्थापनेत मोहन भागवत आणि नितीन गडकरींनी मध्यस्थी करण्याची ‘डिमांड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप-शिवसेनेचे राजकीय नाट्य रंगले असताना आता शिवसेनेच्याच एका नेत्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भाजप आणि शिवसेनेत मध्यस्थी करावी अशी विनंती केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सल्लागार किशोर तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील पत्र लिहून प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

तिवारी म्हणाले की आम्ही मागणी केली आहे की वरिष्ठ नेता आणि मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेशी चर्चा करावी. आम्हाला विश्वास आहे की ते फक्त युती धर्माचे पालन करणार नाहीत तर 2 तासात ही परिस्थिती निकाली निघेल. ते म्हणाले की ही समस्या पार केली तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिल्या 30 महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवण्यात यावे आणि त्यानंतर उरलेल्या कालावधीसाठी भाजपने निर्णय घ्यावा की त्यांना कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे.

तिवारी म्हणाले की भाजप आणि शिवसेनेचा मूड पाहता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत पाहता हे योग्य ठरेल की कोणा एका अनुभवी नेत्याला म्हणजेच नितीन गडकरी यांना राज्यातील युतीसाठी हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्याला पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात यावे. आरएसएसकडून यावर अजून कोणतेही उत्तर आलेले नाही. परंतू मुखपत्र ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांना खोटारडे, बेताल, जोकर आणि शेखचिल्ली देखील म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधीची भेट झाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलेल अशी चर्चा होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले की पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वात सरकारचा भाग बनण्यासाठी इच्छूक आहे. हे सर्व त्यावर निर्भर आहे की शिवसेनेची आणि भाजपची युती होती की नाही. याआधी चर्चा होती की भाजपला शिवसेनेबरोबर युती कायम ठेवण्यासाठी एक दोन महत्वाची मंत्रालये शिवसेनेला द्यावी लागतील. परंतू मुख्यमंत्री, गृहमंत्री, शहर विकास मंत्रालय शिवसेनेला देण्यास तयार नाही.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास