Shivsena MP On CM Uddhav Thackeray | शिवसेना खासदाराचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त शब्दांत टीकास्त्र; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP On CM Uddhav Thackeray | राज्यात एकीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे पक्षातील काही वाद देखील उफाळले जात आहेत. शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसल्याची खंत परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) व्यक्त केली. तसेच शिवसेनेला डावललं जात असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. (Shivsena MP On CM Uddhav Thackeray)

पुण्यात (Pune News) 25 ते 29 मे या कालावधीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyanv) राबविले जात आहे. या अभियानाची पुण्यातील जबाबदारी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर आहे. पुण्यातील विकासकामे, समस्या, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत तसा अहवाल ते पक्षाकडे सादर करणार आहे. तत्पुर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केलीय.

”शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पाठबळ मिळत नसल्याने येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. भाजपचे (BJP), राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्यांना 60 टक्के आणि इतरांना 20-20 टक्के सत्तेचा शेअर मिळायला हवा. पण विकासकामांमध्ये हा शेअर मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची खंत असल्याचं,” खासदार जाधव यांनी म्हटलं आहे.

पुढे जाधव म्हणाले, ”राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिले जाते, मात्र शिवसेनेला डावलण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे पोहचवणार आहे. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर द्यावा, अशी त्यांना विनंती असल्याचही,” ते म्हणाले.

Web Title : Shivsena MP On CM Uddhav Thackeray | parbhani shiv sena mp sanjay jadhav criticized to cm thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त