‘या’ कारणामुळं शिवसेनेच्या आमदारांची ‘संभ्रामवस्था’, उध्दव ठाकरे चर्चा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तास्थापनेविषयी कोणताही तोडगा निघत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वथता व संभ्रमावस्था वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे.

गेल्या 30 वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेत दरी निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला. तर शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणाही भाजपनं केली आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी महाआघाडीची चर्चा आहे. मात्र नेत्यांच्या चर्चा, बैठका आणि खलबतं यामुळं सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.

शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा –
सत्तास्थापनेविषयी शरद पवार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. यातूनच शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना कुठला संदेश देतात , सत्तास्थापनेविषयी नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com