शिवसेना जिल्हा प्रमुखांनी गुप्त भेटीच्या चर्चा धुडकावल्या, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांशी फक्त सदिच्छा भेट’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) उतरले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत आनंदराव पवार यांच्याशी शिवसेना कार्यालयात गुप्तपणे चर्चा केल्याचं बोललं जात होतं.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फक्त सदिच्छा भेट दिली, त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंद पवार यांनी दिले आहे. चंद्रकांतदादा सांगलीतील शिवसेना कार्यालयात गेल्यानंतर गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (Shivsena Sangli District Chief denies political talk with Chandrakant Patil) सांगली जिल्ह्यामध्ये पदवीधरचे ८४ हजार १९१ मतदार आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी सांगली जिल्ह्यातून मोट बांधण्याचे ठरवलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी याआधी सदाभाऊ खोत यांची तलवार म्यान केली होती

सर्व शिवसैनिक हे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण अण्णा लाड यांचाच प्रचार करणार आहेत. शिवाय इस्लामपूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी सोडून सर्वपक्षीय आघाडीची सता आहे, त्यामुळे तिथे भाजप आणि शिवसेना युती आहे असं म्हणता येणार नाही. मी नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. आम्ही शिवसेनेत वरिष्ठांच्या आदेशावर काम करतो.
आनंद पवार, जिल्हाप्रमुख, सांगली

पुण्यात कोणामध्ये लढत ?
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधरसाठी ६२ तर शिक्षकसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून ६२ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे दोघेही सांगली जिल्ह्यातील आहेत.

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार
अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील (मनसे)
शरद पाटील (जनता दल)
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी)
श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)
डॉ. अमोल पवार (आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)