धक्कादायक ! भाच्यानं मामाला जिवंत जाळलं, पुणे जिल्ह्यातील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यास जिवंत (burned) जाळले. तळेगाव दाभाडे (talegaon-dabhade) येथील जाधव चाळ येथे मंगळवारी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. विजयसिंग भगवानसिंग जव्हेरी (वय 55) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. तर नारायण विजयसिंग जव्हेरी (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विजयसिंगची पत्नी मीना विजयसिंग जव्हेरी (वय 47, रा. जाधव चाळ, तळेगाव दाभाडे ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुदर्शन त्याची पत्नी विशाखा तसेच त्याचा एक वर्षाचा मुुलगा हे मध्यप्रदेशातील इंदोर येथे राहतात. फिर्यादी यांचे पती विजयसिंग यांची वीस वर्षापूर्वी ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अंथरुणावर पडूून होते. पती आजारी असल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या लीलाबाई चव्हाण यांना बोलावले होते.

दरम्यान फिर्यादी यांचा लहानभाऊ विजयसिंग गुलाबसिंग जव्हेरी हे कुटुंबासह तळेगाव येथे राहण्यासाठी आले होते. फिर्यादी यांच्या घराशेजारी एका खोलीत ते वास्तव्यास होते. फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा नारायणसिंग हा दारू पिऊन त्यांच्या कुटुंबाना त्रास देत असे. मंगळवारी पहाटे तो फिर्यादी यांच्याकडे आला. दारावर लाकडाने मारून दार उघडला.

त्यावेळी त्याच्या हातात सिमेंटचा दगड होता. घरात झोपू न दिल्यास मारून टाकू अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे फिर्यादी आणि लिलाबाई चव्हाण या घाबरून घराबाहेर पळाल्या. त्यानंतर नारायसिंग याला घरात कोंडूून ठेवले. त्यानंतर फिर्यादी आणि लिलाबाई चव्हाण यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातून धूर येत होता. आरोपीने फिर्यादीच्या पतीला जाळल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

You might also like