विशाखापट्टणम गॅस गळतीचे CCTV फुटेज आले समोर, भयानक होती घटना

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – 7 मे रोजी सकाळी विशाखापट्टणम जिल्ह्यातील एलजी पॉलिमर फॅक्टरीमधून निघालेला विषारी गॅस हवेत पसरला यामुळे 12 जणांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यात विषारी गॅस कसा बाहेर पडला हे दर्शविले गेले आहे.

एलजी पॉलिमर फॅक्टरीमधून विषारी गॅसची गळती 7 मेच्या पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास झाली होती. काही मिनिटांतच हा गॅस जवळच्या 5 गावांमध्ये पसरला. सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे की, जवळच्या व्यंकटपुरम गावात विषारी गॅस कसा पसरत आहे.

दुसर्‍या फोटोमध्ये पाहिले तर रात्रीच्या 3 वाजून 51 मिनिटे झाली होती तेव्हा गॅस बाहेर पडत होता आणि गॅस जेव्हा हवेत पसरला तेव्हा तेथील एक व्यक्ती वाहनाच्या बोनटवर बेशुद्ध पडला. तिसऱ्या फोटो रस्त्यावर चालणारी एक स्त्रीसुद्धा बेशुद्ध पडली.

चौथ्या फोटोमध्ये आपण पाहिले तर एक मूल रस्त्यावर पडले आहे एका-एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होताना दिसत आहे. कारखान्याच्या गॅस गळतीनंतर आजूबाजूची गावे किती धोकादायक झाली असतील हे पाहणे फार भयावह आहे हे पाहून व्यंकटापुरम गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हे फोटो टिपले आहेत. एलजी पॉलिमर कारखान्यात स्टायरिन गॅस गळतीच्या दुर्घटनेत केवळ 12 जण ठार झाले होते. परंतु 45 मुलांसह 300 लोकांची प्रकृती चिंताजनक होती.

आश्चर्य म्हणजे अपघाताला 9 दिवस लोटूनही अद्याप या प्रकरणामध्ये दोषी आढळला नाही की त्याला अटकही झालेली नाही. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या गॅस गळतीची फोटो पाहिले तर प्रत्येकाला हे भयानक वाटेल यात शंका नाही