…म्हणून ज्येष्ठ महिलेला तब्बल 120 वर्षांच्या आईला खाटेवरून न्यावं लागलं बँकेत
पोलिसनामा ऑनलाईन – सेवा आणि सुविधा नसल्यामुळे अनेक बँकाचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशीच एक घटना घडली असून बँकेच्या सूचनेनुसार एका ज्येष्ठ महिलेने 120 वर्षांच्या आईच्या पेन्शनसाठी खाटेवर टाकून बँकेत घेऊन जाण्यास भाग पाडले. ओडिसातील नौपाडा जिल्ह्यातील खरिअर ब्लॉकमधील बारगन गावात गुरुवारी ही घटना घडली आहे.
वृद्ध महिलेने 70 वर्षीय मुलगी गुंज देई यांना बँकेतील पेन्शन अकाऊंटमधून 1 हजार 500 रुपये काढण्यासाठी बँकेत पाठवले. ज्यावेळी गुंज देई बँकेत पोहोचल्या तेव्हा बँक अधिकार्यांनी त्यांना पेन्शनची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच खातेधारक महिलेला प्रत्यक्ष बँकेत हजर करण्यास सांगितले.
गुंज देई या स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातच 120 वर्षे वय असलेल्या त्यांच्या आईला चालता येत नाही त्या अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे गुंज देई यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी एका खाटेवर आईला टाकून ओढत ओढत बँकेत नेले. जेव्हा गुंज देई आईला खाटेवरुन घेऊन बँकेत पोहोचल्या तेव्हा त्या दोघींचे वय आणि अवस्था पाहून बँकेच्या अधिकार्यांनी त्यांची तातडीने पेन्शनची रक्कम काढून दिली. आईला खाटेवरुन ओढत बँकेत नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्विटर युजर्सनी बँकेच्या अधिकार्यांवर जोरदार टीकस्त्र सोडले आहे.