धक्कादायक ! ‘मी मृत्यूला कवटाळतोय’ ; पत्नीला व्हिडिओ कॉल करीत तरुणाने संपविले जीवन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कामावर गेलेल्या पत्नीला त्याने व्हिडिओ कॉल केला आणि त्याने मी आता जिवंत रहात नाही, असे सांगितले. पत्नी तातडीने घरी आली. तेव्हा तो घरात मृतावस्थेत आढळून आला. निखिल पंकज शहा (वय ३३, मुळ रा. डहाणु, जि़ पालघर) असे या तरुणाचे नाव आहे. निखिल याचा मृत्यु कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

निखिल एका मोबाईल कंपनीत डिस्ट्रीब्युटर होता. तर त्यांची पत्नी खुशबू ही एमआयडीसीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी करते. मंगळवारी खुशबू कामावर गेल्यावर निखिल एकटाच घरी होता. दुपारी त्याने खुशबू हिला व्हिडिओ कॉल केला व मी आता जिवंत रहात नाही़ मृत्युला कवटाळतो आहे, असे सांगून व्हिडिओ कॉल बंद केला. त्यानंतर पत्नीने घरी येऊन पाहिल्यावर तो मृतावस्थेत सापडला. निखिल याने कशामुळे आत्महत्या केली, याचे कारण समजू शकले नाही. तसेच त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे प्रथमदर्शनी स्पष्ट होऊ शकले नाही़. शवविच्छेदनातून त्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

Loading...
You might also like